| मुख्य पृष्ठ |
शाखा
|
अभिप्राय
|
करीयर
|
आमच्याशी संपर्क साधा
|
साइट मॅप
|
|
दि डेक्कन मर्चंन्टस् को-ऑप. बँकेच्या वेबसाईट वर सर्व ग्राहकांचे आणि सभासदांचे मन:पूर्वक स्वागत करतो आणि आमच्या बॅंकेवर विश्वास ठेवून आपला बँकींग व्यवहार व आपली बचत आमच्या बॅंकेबरोबर केल्याबद्दल मी आपले आभार मानतो. या आर्थिक वर्षांत बँकेचा व्यवहार १५०० कोटींपर्यंत पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्या बँकेला एक मजबूत बॅंक बनविण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. अनुत्पादित कर्जाचे प्रमाण रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अत्यल्प ठेवण्यासाठी चांगल्या कर्जदारांना कर्ज देण्याचे आमचे धोरण आहे.
पुढील पाच वर्षांत बँकेला बहुराज्यीय शेडयूल्ड बँकेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बॅंकेचे स्वत:चे आरटीजीएस / एनईएफटी सेट अप असावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बँकींग विषयक सल्लागार श्री. शांताराम पाध्ये आणि श्री. सी. बा. अडसूळ यांच्या मार्गदर्शनानुसार शाखांच्या कामकाजाचा आढावा घेऊन अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन खातेदार व सभासदांना तत्पर सेवा मिळावी म्हणून कामकाजात बदल करण्यात आले आहेत.
सध्या बॅंकेमार्फत कोअर बँकींग, एसएमएस सुविधा, रुपे एटीएम कार्ड, आरटीजीएस / एनईएफटी, इ-फ्रँकिंग इत्यादी अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येत आहेत. अल्पावधित इंटरनेट बँकींग आणि मोबाईल बँकींग सेवा पुरविण्यासाठी बॅंक प्रयत्नशील आहे.
धन्यवाद.
श्री. प्रमोद कर्नाड
व्यवस्थापकीय संचालक
पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४