| मुख्य पृष्ठ | शाखा | अभिप्राय | करीयर | आमच्याशी संपर्क साधा | साइट मॅप |


                                           
अध्यक्षांचे मनोगत


दि डेक्कन मर्चंन्टस् को-ऑप. बँकेच्या वेबसाईट वर मी आपले मन:पूर्वक स्वागत करीत आहे. डेक्कन बँकेला ९९ वर्षांची अविरत सेवेची दैदीप्यमान परंपरा आहे. बॅंकेची स्थापना कै. श्री. चिंतामणराव सामंत यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १९१७ साली केली. गेल्या ९९ वर्षांच्या काळात बँकेने अनेक गरजू व्यक्ती व उद्योजक यांना आर्थिक सहाय्य करुन समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. आचार्य अत्रें सारख्या साहित्यीकांनी देखील बँकेच्या मदतीच्या जोरावर आपली प्रगती साधली ही बाब आम्हासाठी अभिमानास्पद आहे.

बदलत्या काळा बरोबर बँकेने स्वतःमध्ये अनेक बदल घडवत नवनवीन तंत्रज्ञान ज्या मध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा असे कोअर बँकींग, रूपे डेबीट कार्ड, ई-फ्रॅंकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस बँकींग आदि सुविधांचा अवलंब आपल्या ग्राहक सेवेमध्ये केला आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाने ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदरांमध्ये ठेव व कर्ज योजना आणून बॅंकेच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. बँकेचा कर्मचारी व अधिकारी वर्ग ग्राहकांस सर्वोत्तम सेवा देण्यास सदैव तत्पर आहे. या पुढील काळासाठी बॅंकेच्या संचालक मंडळाने बॅंकेचे विजन डॉक्युमेंट २०२० बनविले आहे. त्या आधारे नवीन पिढीसाठी नेक्स्ट् जनरेशन बँकींग आणणे, बॅंक पुढील वर्षी १०० वर्ष पुर्ण करीत असताना बँकेचा व्यवसाय १५०० कोटींच्या पुढे नेणे, बँकेच्या शाखांची संख्या २० पर्यंत नेणे व ग्राहक सेवे मध्ये इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग व पेमेंट गेटवेजचा अंतर्भाव करणे आदि बाबींचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो.

मला खात्री आहे की आपण ग्राहक व सभासद म्हणून जो विश्वास माझ्यावर व संचालक मंडळावर दाखविला आहे त्या जोरावर आम्ही डेक्कन बँकेला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जावू.
धन्यवाद .

         आपला,
 काशिनाथ दिनकर मोरे
         अध्यक्ष


map

पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४