| मुख्य पृष्ठ | शाखा | अभिप्राय | करीयर | आमच्याशी संपर्क साधा | साइट मॅप |


                                           
बॅंकेची वाटचाल


१६ एप्रिल,१९१४ रोजी काही कापडवाले, छापखानेवाले, पुस्तक प्रकाशक आणि औषधांचे विक्रेते असे मराठी व्यापारी एकत्र जमले आणि आपली संघशक्ति संघटित कशी करावी व वाढीस लावावी याचा विचार विनिमय झाला. त्यातून डेक्कन मर्चन्टस् असोसिएशन या नावाची संस्था स्थापन करण्यात आली. पुढे या असोसिएशनच्या सभासदांच्या दिनांक २० ऑगस्ट १९१७ रोजीच्या सभेमध्ये अर्थशास्त्रज्ञ आणि सहकार चळवळीतील मान्यवर कै. श्री. चिंतामणराव सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि आशिर्वादाने डेक्कन मर्चन्टस् को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

अशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळात दि. ३० ऑगस्ट, १९१७ रोजी बॅंकेची स्थापना करण्यात आली. बॅंकेचे पहिले अध्यक्ष आणि संस्थापक तसेच स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते आणि लोकमान्यांचे अनुयायी कै. चिंतामणराव तथा तात्यासाहेब सामंत होते. ३ एप्रिल,१९६८ रोजी बॅंकेच्या सुवर्णमहोत्सवाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री मा. ना. श्री. बाळासाहेब देसाई यांनी बँकेस "असमर्थास समर्थ करणे" हे बोधवाक्य सुचविले आणि हेच ब्रीद मानून बॅंकेची वाटचाल चालू आहे. बॅंकेची पहिली शाखा गिरगाव येथे सुरू करण्यात आली आणि आता मुंबई शहर, ठाणे, नवी मुंबई, रायगड व पुणे या जिल्ह्यात बॅंकेच्या १३ शाखा आणि २ कार्यालये आहेत .


map

पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४